मुंबई (वृत्तसंस्था) – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर विरोधक सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यावर, आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान राणे यांनी ट्विट केले आहे की,’कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे आणि दुसरं, माहिती लपवणं निवडणूक आयोगा नुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.’ असं म्हणत निलेश राणे यांनी सुद्धा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.







