जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांचा एकलव्य आदिवासी क्रांतीदल संघटना,जामनेर यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. पोलिस निरीक्षक यांची कर्तव्य दक्षता लक्षात घेऊन या संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बाबासाहेब बोरसे, संस्थापक (एकलव्य आदिवासी क्रांतिदल संघटना), सीताराम सोनवणे, संपर्क प्रमुख (जळगांव जिल्हा), सुभाष पवार, संपर्क प्रमुख (नाशिक जिल्हा), विनोद सोनवणे माजी सरपंच, मिठाराम मोरे माजी सरपंच, जगदीश महाजन माजी सरपंच, जगन सोनवणे,रामचंद्र सोनवणे, श्रीराम सोनवणे, रामदास सोनवणे, आबा सोनवणे, उषा बाई चव्हाण, लताबाई सोनवणे, काविताबाई सोनवणे,गणेश सोनवणे, राजे पवार,लक्ष्मण सोनवणे, संतोष सोनवणे, देवराज सोनवणे, रामकृष्ण सोनवणे आदी सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते.







