जळगाव (प्रतिनिधी) – सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली तसेच विपोमनि,महीला बाल अत्याचार प्रतिबंध विभाग मुंबई यांचे आदेशान्वये हरविलेल्या बालकांचे संदर्भात ऑपरेशन मुस्कान-९ ही शोध मोहीम दिनाक ०१/१२/२०२० ते ३१/१२/२०२० या कालावधीत जळगांव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक मा.डॉ. प्रविण मुंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, व सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक याचे सह पोहेकॉ दादाभाऊ पाटील,पोहेकां बसंत लिंगायत मपोकां गायत्री सोनवणे, व जिल्ह्यातील केशवस्मृती प्रतिष्ठाण अंतर्गत न समतोल प्रकल्प, यांचे सहकार्याने राबवित असतांना आजपावेतो एकुण-७ (४ मुले व ३ मुली ) लहान मोठे बालक हे शिक्षण न करता, शहरातील सिग्नल, रेल्वे स्टेशन येथे पैशांची भिक मागुन त्यातुन व्हाईटनरचा नशा करण्याचे प्रमाण – खुप मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे निदर्षनात आले आहे. सदर बालांकाना त्याचे पालकांकडे सोडुन त्यांना समजपत्र देवुन कायदेशिर समज देण्यात आलेली आहे.
तरी सदर मोहीमे दरम्यान हरविलेल्या जास्तीत जास्त बालकांचा शोध घेण्यात येवुन त्याचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. सदर ऑपरेशन मुस्कान-९ या मोहीमेस कोणी शासकीय, अशासकीय सामाजिक संस्था मदत करण्यास इच्छुक असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, कार्यालयास संपर्क साधावा.







