धानोरा (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते मुकेश राजेंद्र सोनवणे यांची भारतीय विद्यार्थी संघटनेच्या जळगाव जिल्हाअध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांची ही निवड महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष नितिन दोंदे यांनी नुकतीच केली.नियुक्ती पत्रात विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊन सामाजिक कार्याचा पाठपुरावा करुन भारतीय विद्यार्थी संघटनेचे कार्य सर्व स्तरांवर पोहचवून लौकिक प्राप्त करुन द्यावा असे सांगितले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल उपाध्यक्ष रविंद्र चंदणे,कार्याध्यक्ष सुमेध वाव्हळ,सरचिटणीस ॲड प्रज्ञेश सोनवणे,ॲड महेंद्र आयगोळे,ॲड सुशिल,धनगर,विकास जाधव,भुषण करे,सचिन दोंदे,सिद्धार्ध कनकुटे,विशाल साळवे,प्रमोद भोसले,निलेश सोनवणे,डॉ बी आर आंबेडकर अभ्यासिका संचालक प्रशांत सोनवणे,संदिप पवार यांनी अभिनंदन केले.








