जळगाव (प्रतिनिधी)- गेल्या तीन महिन्यापासून जळगाव कोरोना संसर्गजन्य कक्ष येथे कर्त्यव्य पार पाडत असलेले आणि एप्रिल महिन्यात २१ दिवसात आलेल्या आपल्या थरारक अनुभवाचे कोरोना योध्यांच्या वेदनेचे मृत्यू घराचा पहारा या नावाने देशातील पहिले पुस्तक लिहिणारे मृत्युकार विनोद आहिरे यांनी गोलाणी मार्केटमधील साप्ताहिक केसरीराजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. मुख्य संपादक भगवान सोनार व कार्यकारी संपादक नरेश बागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्या नंतर विनोद अहिरे यांनी त्यांचे मृत्यू घराचा पहारा हे पुस्तक सन्मानाने भेट दिले. त्या पुस्तकाची रचना आणि लिखाण बघून आपोआपच आमच्या मुखातून शब्द निघाले मृत्युकार विनोद आहिरे… त्याच्या पुस्तकाचे आम्ही वाचन केले आसता खरोखरच अंगाला शहारे येईल असे अनुभव ओघवत्या शैलीत त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.
पुस्तकाला महाराष्ट्र पोलीस दलात लौकीक असलेले विश्वास नागरे पाटील यांनी प्रस्तावना दिलेली असून त्यात ते असे म्हणतात की, विनोद अहिरे यांची स्वतःमधील संवेदन शील माणूस, कर्त्यव्य कठोर पोलीस खेळातील स्फूर्ती या बरोबरच स्वतः मधील पत्रकार, लेखक या क्षणी सुद्धा जपला आहे. साधी सरळ भाषा थेट मिळणारी संवेदनशीलताही त्यांच्या लिखाणात दिसते. त्यांच्या सलग २१ दिवसांच्या कर्तव्यात त्यांनी जपलेले माणूसपण सर्वांप्रती आदर, प्रेम दर्शविणारे विचार एकीकडे अन दुसरीकडे कर्त्यव्यात अडकलेले कठोर मन, एकेक ओळीत आपल्याला एका पोलिसाप्रती तितकीच संवेदनशीलता जागे करते. तसेच पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी आपल्या प्रशंसा पत्रात म्हंटले आहे की, मृत्युघराचा पहारा या पुस्तकाचे लेखन करून पोलिसांच्या वेदना व कठोर परिश्रम समाजासमोर आणून सर्व समाजात महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उज्वल केले आहे.
तसेच मुंबई पोलीस दलातील निवृत्त साहाय्य पोलीस कमिश्नर यांनी आपल्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की, विनोद अहिरे यांना उत्कृष्ट लेखनशैली साध्य झाली असून मानवी व्यथा लेखणीद्वारे मांडण्याची त्यांची अप्रतिम शैली वाखाणण्याजोगी आहे. वेदनेची स्वतःची भाषा असते. सख्ख्या बापाचे प्रेत मुलगा स्वीकारत नाही,असे अनेक अनुभव व्यक्तिगत व्यथांसह लेखकाने या पुस्तकात मांडले असून पुस्तक सहज, सुंदर व वाचनीय झाले आहे.
अशा दिग्गच पोलीस अधिकाऱ्यांनी विनोद अहिरे यांच्या मृत्यू घराचा पहारा या पुस्तकाची प्रशंसा केलेली आहे. आम्ही आमच्या साप्ताहिक केसरीराजच्या माध्यमातून सर्वाना आवाहन करतो की, प्रत्येकाने पुस्तक वाचावे.