कर्जबाजारी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने दिली दुहेरी हत्याकांडाची कबुली
सावदा (प्रतिनिधी) – रोझोदा येथील ओंकार पांडुरंग भारंबे व पत्नी सुमन ओंकार भारंबे दोन्ही रा.रोझोदा यांचा तिक्ष्ण हत्याराने खून केल्याची कबुली परेश खुशाल भांरबे याने दिली असून तो इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असून कर्जबाजारी झाल्याने व्यसनाधीन झाला असल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले असल्याने तपासात पुढे आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाने डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक बापु रोहोम , सपोनि राहुल वाघ यांनी गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने महत्वाचे २७ मुद्दे ठरवुन त्या मुद्यांवर माहिती घेवुन तपास करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या २७ मुद्यांमधे मयतांच्या घराबाहेरील ओट्यावर बसणार्या व्यक्तींना बोलावून त्यांची चौकशी करणे हा एक मुद्दा असल्याने ओट्यावर बसणारे ७ ते८व्यक्तींची यादी तयार करण्यात आली व त्यांना चौकशी साठी बोलविण्यात आले त्यात एक एक व्यक्तीची विचारपुस करून त्यांना एका बाजूला बसविण्यात आले. त्यावेळी चौकशी करून बाजूला बसविलेल्या व्यक्तींमधे परेश खुशाल भांरबे ( वय ३२ ) हा मयत ज्येष्ठ नागरिक ओंकार पांडुरंग भारंबे यांचे घरासमोर नेहमी बसत असत व तो इंजिनिअरिंग चा डिप्लोमा चे सेकंड ईयर ला अपियर असून तो सध्या व्यसनामुळे कर्ज बाजारी झालेला आहे बाबत पो ना रिजवान पिंजारी व विशाल खैरनार यांना गोपनीय माहीती मिळाल्याने व त्याची वागणुक व हावभाव संशयित वाटत असल्याने त्यांनी सदरची माहिती सावदा पोस्टेचे सपोनि राहुल वाघ यांना कळवून त्याची पुन्हा चौकशी करुण विचारणा केली त्यावरून सपोनि राहुल वाघ यांनी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना सदरची हकीगत सांगुन परेश यास पुन्हा चौकशी कामी बोलावून विचारपुस केली असता त्याचे आधीच्या सांगण्यात व आताच्या सांगण्यात तफावत जाणविल्याने परेश याचे घटनेच्या दिवशी घातलेले कपडे व त्याच्या आई वडीलांना बोलावून त्यांना विचारपूस केली असता त्यांच्या व परेश याच्या सांगण्यात तफावत आढळून आल्याने परेश याचेवरील संशय अधिक बळावल्याने व पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी त्याच्या शरीराची पाहणी केली असता त्याच्या हातावर जखमा झाल्याचे व हजर केलेल्या कपड्यांवर डाग दिसून आल्याने त्यास त्याबाबत विचारले असता केळीचे डाग असल्याचे सांगितले आता परेश हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आल्याने परेश यास पोलीसी इंगा दाखविताच त्याने सदरचा गुन्हा मीच केला असून मी व्यसनाधीनतेमुळे कर्जबाजारी झाल्याने मला पैशाची गरज होती त्यामुळे मी चोरी करण्याच्या उद्देशाने दि ९ रोजी रात्री ११:३० वाजता मयत ओंकार पाडुरंग भारंबे यांच्या घरी जावुन त्यांचा दरवाजा वाजविल्याने मयत सुमन ओंकार भारंबे यांनी दरवाजा उघडला असता त्या मला ओळखत असल्याने मी त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले त्या पाणी घेण्यास
किचनमध्ये गेल्या असता मी त्यांच्या मागे जाऊन त्यांना बाजूच्या खोलीत ओढत नेऊन त्यांच्या गळ्यावर माझ्या हातातील सुरीने तीन ते चार वार केल्याने त्यांचा जागीच जीव जावून जमिनीवर पडल्यावर मी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन हॉल मध्ये आलो व हॉलमध्ये बसलेले ओंकार पांडुरंग भारंबे यांच्या गळ्यावर माझ्याकडील सुरीने वार करून त्यांना जागीच ठार केले नंतर मी मधल्या खोलीतील कपाटाकडे जाऊन कपाटातील रोख रुपये व बांगड्या घेऊन किचन मधील दरवाजाने बाहेर निघून आमच्या गुरांच्या वाड्यात गेलो त्या ठिकाणी चोरलेला ऐवज लपवून तेथेच झोपलो नंतर सकाळी सकाळी उठून मी माझ्या कपड्यावर रक्ताचे डाग असल्याने माझी पॅन्ट टी-शर्ट गुन्ह्यात वापरलेली सुरी व हात रुमाल हॅन्ड ग्लोज असे जुना फैजपूर रोडवरील शेता जवळील नाल्यात लपवून घरी निघून गेलो असे सांगून गुन्हा कबुल केल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली . त्यास दि १५ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून सदर आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार चोरलेला मुद्देमाल आरोपीचे रक्ताने भरलेले कपडे जप्त करण्यात आले असून आरोपी कडून ५४३४० रु रोख, तसेच ३२३८१ रु किमतीचे सोन्याचे दागिने,असा एकूण ८६७२१ रु किमतीचा ऐवज व घटनेत वापरलेले धारदार चाकू जप्त केला आहे.