जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात आज कोरोनाच्या संसर्गात वाढ सुरूच असून १५० रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात आज एकूण ६६७ कोरोना बाधीत असल्याचे सायंकाळच्या अहवालांमधून समोर आले आहे.
जिल्ह्यामध्ये जळगाव ग्रामीण-१५; भूसावळ-४०; अमळनेर-३२; चोपडा-६१; पाचोरा-२८; भडगाव-०५; धरणगाव-४७; यावल-१८; एरंडोल-२९; जामनेर-११२; रावेर-१६; पारोळा-५५; चाळीसगाव-१९; मुक्ताईनगर-२९;बोदवड-०६ आणि इतर जिल्ह्यातील ०५ असे ६६७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.यात ३६७ अँटीजेन तपासणीमधील तर लॅबमधील तपासणीत ३०० रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात ५३८ रुग्ण बरे झाले असून, ११ जण मृत्युमुखी पडले आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ११६ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात ४ हजार ५११ कंटेनमेंट झोन असून सध्या १ हजार १३३ अहवाल प्रलंबित आहेत. रुग्ण बरा होण्याचा जिल्ह्याचा दर ७१. ४५ % असून मृत्युदर २. ५० % आहे. आजवर जिल्ह्यात ९७१ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.