भुसावळ (प्रतिनिधी) – लॉकडाउन काळात व कोरोना संकटात अविट कर्तव्यपूर्तता करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित केली असून रविवार रोजी ‘भुसावळसह सावदा येथील पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि भुसावळ कारागृहाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.
रविवार रोजी भुसावळ येथील कारागृहाचे माधव खैरागे व कारागृहाचे कर्मचारी , बाजारपेठ पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे ,
तालुका पोलिस ठाणे , उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी तसेच सावदा पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची
मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात प्राथमिक तपासणीसह रक्तदाब, इसिजी,स्क्तातील साखर, नेत्र तपासणी समावेश होता. या प्रसंगी रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन पाटील, डॉ. महेश पांगळे , डॉ. कुशल पाटील यांनी या उपक्रमांतर्गत तपासणी केली.