जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव शहरातील हायवे दर्शन कॉलनी ते गुजराल पेट्रोल पंप येथील रस्त्यावर दुपारी साडेबाराच्या सुमारास मुरूम व दगडांनी भरलेली ट्रक अमृत योजना अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी रस्ते खोदून ठेवले असून ते जेसीबीने बुजवतांना थातुरमाथुर रस्ते अर्ध्यावरच सोडून देत असल्याचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार हायवे दर्शन कॉलनी ते गुजराल पेट्रोल पंप येथील रस्त्यावर रुतल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. नेहमी मोठ्या प्रमाणात या परिसरात विविध वाहनांची वर्दळ सुरू असते.
हायवे दर्शन कॉलनी ते गुजराल पेट्रोल पंप येथील रस्त्यावर दुपारी साडेबाराच्या सुमारास ट्रक क्रमांक (एम.एच. ०४ बीजी ४२७१) हा मुरूम घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेला जाऊन पावसामुळे जमीन नरम ( ठिसूळ ) झाल्याने वाहन चालकास अंदाज न आल्याने तो ट्रक फसला आहे. चालकाने खूप
प्रयन करून ही ती अडकलेली ट्रक निघत नसल्याने वाहतुकीस त्या परिसरात अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरसेवकांनी ही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वाहन आणि नागरिकांची होणारी त्रेधातिरपीट व गैरसोय टाळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








