मोटारसायकल, रोख रक्कम व मोबाईल लुटले;
गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी ) – काम आटोपून घराकडे निघालेल्या पत्रकाराच्या मोटारसायकलवर मागे बसून त्याला चाकूचा धाक दाखवित त्याची मोटारसायकल, रोख रक्कम व मोबाईल लुटल्याची घटना दि.12 रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सिधी कॉलनी परिसरातील कंवरनगर येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील रामनगर परिसरातील संतोष दिगंबर ढिवरे हे पत्रकार असून ते शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही कामानिमीत्त बी. जे. मार्केट परिसरात गेले होते. काम आटोपून संतोष हे आपल्या मोटारसायकलने घराकडे जात होते. यावेळी मेहरुण परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ त्यांना त्यांचा भाचा सिद्धांत बाविस्कर याठिकाणी भेटाला असता संतोष हे त्याच्यासोबत बोलत उभे होते. यावेळी नागसेन नगरातील रितेश शिंदे उर्फ चिन्या हा त्यांच्या दुचाकीवर मागे येवून बसला.
रितेश शिंदे उर्फ चिन्या हा सऱ्हाईत गुन्हेगार असून तो संतोष यांच्या गाडीवर बसला आणि तू पत्रकार असून तू भरपुर पैसे कमवतो असे म्हणत मला आत्ताच्या आत्ता ५० हजार रुपये दे नाही तर तुला जीवे ठार मारेल अशी धमकी देत संतोष यांच्या खिशातील मोबाईल त्याने काढून घेतला.
चिन्या हा मोबाईल हिसकवित असतांना त्याला संतोष यांनी विरोध केला असता. त्याने आपल्या खिशातून चाकू काढीत खुपसून देण्याची धमकी दिली. तसेच मोटारसायकल कंवरनगरकडे घेण्यासाठी सांगितली. संतोष याने आपली मोटारसायकल घेवून तो सिधी कॉलनी परिसरातील कंवरनगरकडे गेला असता चिन्याने त्याची मोटारसायकल घेवून जात त्याच्या खिशातून ५ हजार रुपयांची चांदीची चैन, ३ हजार ७०० रुपये रोख असा मुद्देमाल घेवून तो र्ईच्छादेवी चौकाकडे पळून गेला. याप्रकरणी संतोष ढिवरे यांच्या फिर्यादिवरुन एमआयडीसी पोेलिस ठाण्यात राकेश शिंदे उर्फ चिन्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.