


आम्ही आमच्या मागच्या विशेष संपादकीयमध्ये कंगना तू मर्यादेचे कंगन ओलांडलाय या मध्ये कंगनाच्या वर्तनावर आम्ही आसूड ओढले होते. परंतु कंगना आपल्या वर्तनात काही बदल करायला तयार नाही. ती अजूनही तिच्या फिल्मी दुनियेतुन बाहेर यायला तयार नाही. एकंदरीत आम्हाला तर असेच वाटते आहे. की,ती फक्त तिला लिहून दिलेली स्क्रिप्टच वाचन करून बोलत आहे. असाच आम्हाला संशय येत आहे. परंतु कंगनाला हे माहित नाही की, तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक जर राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असतील तर तो कदाचित आज ना उद्या समोर येतीलही. जनता त्यांच्या तोंडावर थुंकेलही पण तो पर्यंत कंगनाचा प्रतिष्ठेचा आणि अभिनयाचा खांदा तिच्या धडापासून वेगळा झालेला असेल. पुढील आयुष्य मात्र खांदा (पंख) तूटलेल्या पक्षाप्रमाणे जगावे लागेल, म्हणून आमची कंगणाला सूचना आहे की, तू अभिनयाची राणी आहे. चांगल्या-वाईटाची तुला जाण आहे. परंतु कंगना आपल्या फिल्मी दुनियेच्या मस्तीतून बाहेर यायला तयार नाही. ती मानते की, मी झाशीची राणी आहे. आणि मी सगळ्यांना पुरून उरेल. वैचारिक व्यंगत्व आलेले समर्थक देखील तिचा झाशीची राणी म्हणून म्हणून हिमनगाच्या टोकावर तिला चढवत आहेत. परंतु टोकावरून तिचा कोणत्याही क्षणाला पाय घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच कंगना तू लवकर भानावर ये नाहीतर तुझा वैचारिक मृत्यू हा अटळ आहे. एवढेच आमचे सांगणे आहे. आणि हो कंगना कोणी सिनेमामध्ये डॉनचा अभिनय केला म्हणून प्रत्यक्ष जीवनात डॉन होत नाही. तसेच तू झाशीच्या राणीचा अभिनय केला म्हणून स्वतःला झाशीची राणी म्हणून घेण्याचा प्रयत्न करू नकोस,कारण तो राणी लक्ष्मीबाईंची अपमानच असेल. पण ज्या पद्धतीने तू मनकर्णिका सिनेमामध्ये झाशीच्या राणीचा अभिनय केला तुझ्या तळपत्या तलवारीने इंग्रजांचे शिरक्रांण केले. त्यांच्या रक्तांनी फिल्मी दुनियेतील मातृभूमी अक्षरशः तू धुवून काढली म्हणूनच कदाचित तू आणि वैचारिक व्यंगत्व आलेले समर्थक तुला झाशीची राणी म्हणत असेल. तर मग रज्जो सिनेमामध्ये तु एका वारांगणेची भूमिका उत्कृष्ट साकारली आहे. मग वारांगणा झालीस का? त्या सिनेमामध्ये तुझ्या मालकीनीने …… म्हटले आहे, मग तु ….. झालीस का? प्रत्यक्ष आयुष्य जगतांना ते तु करशील का? अर्थात याचे उत्तर नाहीच असेल. म्हणूनच सांगितल्या प्रमाणे कोणी डॉनची भूमिका केली म्हणून प्रत्यक्ष जिवनात डॉन होत नाही. आणि तुही झाशीच्या राणीची भूमिका साकारली म्हणून तु झाशीची राणी होऊच शकत नाही. त्या करीता तु लवकर भानावर ये रज्जो (कंगना). कंगना मुंबईची माफी व मुंबई पोलिसांची माफी माग, परंतु तुझा नैतिक अहंगंड इतका शिगेला पोहोचला आहे. की, माफीतर दूरच पण साधी दिलगिरी व्यक्त करायची सुद्धा तुझ्यात माणुसकी उरली नाही. ज्या मुंबई पोलिसांचा अपमान केलास तेच मुंबई पोलीस विमानतळावरून तुला सुरक्षित घरी घेऊन आलेत. आणि डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस तुझ्या बंगल्या समोर पहारा देत आहेत. आणि तरीही कंगना तुझी टिव टिव सुरूच आहेत.
भगवान सोनार
संपादक केसरीराज







