मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये बॉलिवूडमधील अनेक नावे समोर येत आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून याप्रकरण कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रामपाल आज सकाळी दहा वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाला आहे.याबाबत एनसीबीने अर्जुनला समन्स बजावण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी एनसीबीने बुधवारी अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्स हिची देखील चौकशी केली. त्यानंतर आता अर्जुनला देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, एनसीबीने दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत अर्जुन रामपाल याच्या घरातून काही बंदी असणारी मेडिसिन्स जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेली ही औषधं एनडीपीएस कायद्याअंतर्गत येतात.







