नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राज्य सरकारने आज लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यानंतर यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. लॉकडाऊन व कलाकारांकडून मागणी केल्या जाणाऱ्या पैशांवरून आज भाजपचे आमदार नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राणेंच्या आरोपांना शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिउत्तर दिले असून ‘ राणेंच्या आरोपांना आम्ही भीक घालत नाही असे शेवाळे यांनी म्हणत असून.’शेतकरी आंदोलनाच्या वेळी कुणी ट्विट करायला लावलं? याच उत्तर अगोदर राणेंनी द्यावं,’ अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मुंबई मॉडेलवरून आमदार नितेश राणेंनी राज्य सरकारवर सडकून टीका होती. यामध्ये राणेंनी ‘सरकारचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा आहे. मुंबईत सर्व परिस्थिती ठीक आहे तर पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवून मुंबईकरांना का शिक्षा देत आहे ? स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे सरकार आता कलाकारांकडे पैसे मागत असल्याचाही गंभीर आरोप आमदार राणेंनी केला होता.
नितेश राणेंनी केलेल्या आरोपानंतर त्यांना शिवसेनेचे खासदार शेवाळे यांनी प्रतिऊत्तर दिले. तर मुंबईच्या महापौर पेंडसेंनीही राणेंनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतला. ज्यांच्याकडे पैसे मागितले आहेत. अशा कलाकारांनी समोर यावं,’ असं आवाहनही महापौर किशोरी पेंडसे यांनी केले. वारंवार राणेंकडून टीका केली जात असल्यामुळे त्यांच्या या टीकेला ठाकरे सरकारमधील नेत्यांकडून उत्तर दिले जात आहे.