जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील ॲक्साॅन ब्रेन हाॅस्पिटल येथे शुक्रवार १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी डॉक्टरांनी व नातेवाईकांनी परिचारिकांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी डॉ निलेश किनगे, डॉ. वैजयंती किनगे, राहुल पाटील, आकाश चौधरी यांच्या हस्ते सर्व परिचारिकांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मॅनेजर राकेश सोनार, डॉ शाह, डॉ. राठोड, डॉ नारखेडे, डॉ आकाश, डॉ. अभय भावे व सर्व स्टाफ हजर होता.