पाचोरा ( प्रतिनिधी ) – स्वातंत्र्यसैनिक स्व. दामोदर महाजन यांची नात व ध्येय करिअर अँकेडमीचे संचालक संदीप महाजन आणि गो. से . हायस्कुलच्या शिक्षीका शितल महाजन यांची कन्या कु.डॉ. वैष्णवी महाजन यांचा आज गणितातील पीएचडीबद्दल शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला .
कु.डॉ. वैष्णवी महाजन हिने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधुन गणितात पदवी , पदव्युत्तर पदवी , विशेष प्राविण्यासह बी एड असे यश प्राप्त करून गणित विषयात J.J.T.U. येथुन Certain Investigations On Algebraic Structure Of Groups And Rings या विषयात संशोधन करून वयाच्या 26 वर्षी Ph.D. प्राप्त केली. उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी वयात Ph.D प्राप्त करणारी ती पहीली व्यक्ती ठरली आहे . कु.डॉ. वैष्णवी पाचोरा येथील शेठ एम. एम. कॉलेजमध्ये तिन वर्षापासुन मॅथ विभागप्रमुख आहेत या यशाबद्दल आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी शिवसेना जि.प.गटनेते रावसाहेब पाटील, उद्धव मराठे, शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिलदीकर, सतीश चेडे , नगरसेवक राम केसवाणी आदी शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.