जनकल्याण फाऊंडेशन तर्फे जामनेर येथे १०१ महिलांचा सन्मान’!
जामनेर (प्रतिनिधी) – शहरात महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी व कोविड काळात उत्कृष्ट सामाजिक योगदान करणाऱ्या १०१ महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
समाजसेविका, शैक्षणिक, आरोग्य, पत्रकारिता, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनी यांचा सत्कार व सन्मान १२ मार्च २०२२ शनिवार रोजी दुपारी १२:३० वा. पंचायत समिती हॉल जामनेर येथे करण्यात आला. मान्यवरांच्य हस्ते ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्रीकांतदादा मोरे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तेली, डॉ.सौ.किरण पाटील, अंगणवाडी सुपरवायझर सौ.जया रणधीर नाईक, सौ.निशा रतन तेली, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन संघ उ.म.अध्यक्ष दिपक पाटील सर, पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र गोरे, शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनील वाघ, ह्यूमन राइट्स उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अश्विन रोकडे सर, माहिती अधिकार संघटना उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज वाघ, खिरोदा प्र. रावेर, पोलिस मित्र संघटना उत्तर महाराष्ट्र संघटक रितेश सोनवणे, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन संघ जळगाव जिल्हा अध्यक्ष सौ.नम्रता बिराडे, आरोग्य सेवक विठ्ठल नेरकर आदी. मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रथम मुख्याध्यापिका न्यू इंग्लिश स्कूल जामनेर सौ.मंदा देशमुख मॅडम यांनी पोवाडा सादर केला. तर चिमुकली चौधरी हिने सर्व आर्इंसाठी गीत सादर केले. तसेच यावेळी महिला दिनाचे महत्व व महिला सन्मान प्रसंगी पत्रकार मिनल चौधरी, मीना शिंदे, मनिषा तुकाराम चौधरी, रावेर येथील नगरसेविका, भुसावळ येथील सौ.राजश्री नेवे, निरजना तायडे आदी.महिलांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महासचिव रविंद्र शिवदास सुर्यवंशी, जनकल्याण फाउंडेशन अंतर्गत नारीशक्ती उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा सौ.उज्वला चवरे, पोलिस मित्र संघपोलिस मित्र संघटना उत्तर महाराष्ट्र संघटक रेखा जैन, सहसंघटक सौ.भाग्यश्री लुंकड, पोलिस मित्र संघटना जामनेर तालुका अध्यक्ष निलेश पाटील सर, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन संघ जामनेर तालुका अध्यक्ष विनोद माळी सर, पोलिस मित्र संघटना जळगाव जिल्हा प्रशांत महाले यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविंद्र सुर्यवंशी तर आभार विनोद माळी यांनी मानले. कार्यक्रमास समाजसेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मोठ्या संख्येने उपस्थित होते.