जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुमारे ७० कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरिता मंगळवारपासून संपावर जाणार आहेत. त्याबाबतचे निवेदन सोमवारी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना देण्यात आले. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनादेखील सहभागी झाल्या आहेत, मात्र रुग्णांचा विचार करून त्यांनी काळ्या फिती लावून काम करून पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य वैद्यकीय प्राध्यापक संघटनेने देखील संपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे.
राज्यभरातील १७ लाख सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयातील सुमारे ७० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपत सहभाग घेतला आहे. त्यानुसार दुपारी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना त्यांनी निवेदन दिले आहे. निवेदन देताना विजय जगताप, संदीप बागुल, गोपाल साळुंखे, जे. एस. गवळी, गणेश घुगे, डॉ. नितीन महाजन, नरेंद्र पाटील, गणेश धनगर, सूर्यकांत वसावे, देविदास गायकवाड, शीतल राजपूत, विजया बागुल, मंगेश जोशी, क्षितिज पवार, तुषार निळे, शिवकुमार पदरे, साहेबराव कुडमेथे, उमेश टेकाळे, गोपाल बहुरे, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
दुसरीकडे, परिचारिका संघटनेच्या वतीने सोमवारी दि. १४ रोजी द्वारसभा घेण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत जिल्हा परिचारिका संघटना अध्यक्ष जयश्री जोगी यांनी माहिती दिली. प्रसंगी, “जुनी पेन्शन, एकच मिशन” ” ‘जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या. रुग्णालयात आधीच परिचारिकांच्या जागा रिक्त आहेत. त्यात, साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण आहेत. त्यामुळे रुग्णांच्या हिताचा विचार करून रुग्णालयात येणाऱ्या आपत्कालीन रुग्णांचा विचार करिता परिचारिका संपात सहभाग होणार नाहीत. मात्र जुन्या पेन्शनकरीता काळ्या फिती लावून ते रुग्णसेवा देणार आहेत. यावेळी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांचे कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागणीला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीने सोमवारी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना देण्यात आले. यावेळी डॉ. मारोती पोटे, डॉ. विलास मालकर, डॉ. प्रवीण शेकोकार, डॉ. संजय बनसोडे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. जितेंद्र घुमरे, डॉ. दुष्यन्त पवार उपस्थित होते.