यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नायगाव येथील २७ वर्षीय तरूण बेपत्ता झाला आहे. यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
नायगाव येथे मुबारक उर्फ सलिम सिकंदर तडवी (वय-२७) हा तरूण आईवडील आणि दोन भावांसह वास्तव्याला आहे. सलिम तडवी गावात कामानिमित्त बाहेर जावून येतो असे सांगून ११ जून रोजी दुपारी घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत सलीम घरी न असल्याने आईवडीलांनी चिंता व्यक्त केली. त्यांचा सर्वत्र नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेतला परंतू तो कुठेही आढळून आला नाही. १३ जून रोजी सलीमचे वडील सिंकदर सबाज तडवी यांनी यावल पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.