जळगाव ( प्रतिनिधी ) – पर्यावरण व पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज युवासेना महानगर यांच्या वतीने जिल्हा बाल सुधार गृह येथे १२० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे , उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, महिला आघाडी महानगर अध्यक्षा शोभा चौधरी , युवासेना विस्तारक किशोर भोसले, शिवराज पाटील , सरिता माळी-कोल्हे, उपजिल्हा युवा धिकारी पियुष गांधी, महानगर युवा अधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, विद्यापीठ युवा अधिकारी अंकित कासार, उप महानगर युवा अधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, हितेश ठाकरे, गिरीश सपकाळे, विभाग युवा अधिकारी अमोल मोरे, चेतन कापसे , शिवसैनिक महेश ठाकूर इ.उपस्थित होते.