• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माता व बाल संगोपन रूग्णालय वरदान ठरणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी ) – कोविडच्या आपत्तीमुळे आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले या आपत्तीवर यशस्वी मात केली असून आता माता व बाल संगोपन हॉस्पीटलच्या माध्यमातून नवजात शिशू आणि प्रसूत मातांसाठी अत्याधुनीक सुविधा उपलब्ध होणार आहे. हे १०० खाटांचे रूग्णालय मॉडेल हॉस्पीटल म्हणून लौकीकास येणार असून वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या १०० खाटांची सुविधा असणार्‍या आणि तब्बल २८ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेल्या माता व बाल संगोपन केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते. हे हॉस्पीटल सुमारे १४ महिन्यांमध्येच पूर्ण होणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. प्रमोद पांढरे, इंजि. हरिष पवार, किशोर पाटील, योगेश जावरे, संगोयोचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, आरोग्यसेवक डंपिं सोनवणे, भूषण पाटील, डॉ. गायकवाड, ठेकेदार गणेश ठाकरे यांच्यासह डॉक्टर, व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

आमदार संजय सावकारे यांनी मनोगतातून कोविडपश्‍चात कालखंडात उत्तम आरोग्य सेवा देण्यात येत असून हे हॉस्पीटल यातील पुढचे पाऊल ठरणार असल्याचे प्रतिपादन केले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गेल्या दोन वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे करण्यात आलेल्या बळकटीकरणासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे आवर्जून नमूद केले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, २०१८ साली या हॉस्पीटलचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. गेल्या वर्षी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आता काम सुरू होत आहे. यात ६० टक्के वाटा केंद्र तर ४० टक्के वाटा राज्य सरकारचा असून २८ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या हॉस्पीटलमध्ये प्रसूत झालेल्या महिला आणि नवजात शिशूंसाठी अतिदक्षता विभागासह अद्ययावत अन्य सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. अनेक ग्रामीण गर्भवती महिलांना आधुनिक महागडे उपचार घेता येत नाहीत. त्यांच्यासाठी हे हॉस्पीटल वरदान ठरणार आहे. येथील सुविधांचा विचार केला असता काही वर्षातच हे हॉस्पीटल मॉडेल हॉस्पीटल म्हणून ख्यात पावेल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह या इमारतीवर देखील सौर उर्जा युनीट बसविण्यात येणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

या माता व बाल संगोपन हॉस्पीटलची तीन मजली वास्तू असेल. एकूण क्षेत्रफळ ८४७४६.९५ चौरस फूट असणार आहे. पहिल्या मजल्यावर एलडीआर रूम, चार आयसीयू वॉर्ड, एचडीयूएनबीसीसी डॉक्टर आणि नर्सिंग रूम, तपासणी कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह आणि सोनोग्राफी युनीट असेल. दुसर्‍या मजल्यावर एएनसी पीएनसी वॉर्ड, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, डॉक्टर ओपीडी रूम, आशा रूम आणि आयसीयू वॉर्ड असेल. तिसर्‍या मजल्यावर एमएनसीयू वॉर्ड, केएमसी वॉर्ड, पेडियाट्रीक वॉर्ड, स्कील लॅब, आयसीयू वॉर्ड आणि डॉक्टर व नर्सेसच्या रूम्स राहणार आहेत. यासाठी एकूण २८ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी सिव्हिल सर्जन डॉ. पंकज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मुकुंद गोसावी यांनी केले. तर आभार डॉ. अमित वागदे यांनी मानले.


 

 

Tags: #gulabrav patil news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

धावती कार उलटून मेह्करचा व्यापारी ठार

Next Post

युवासेनेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

युवासेनेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon