जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये गुरुवार दिनांक १३ जुलै ते १५ जुलैपर्यंत मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी (MET)या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील डॉ.केतकी हॉल येथे आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी एनएमसीचे निरीक्षक डॉ.झुबेरी हुसेन, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, मेटचे समन्वयक डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.कैलास वाघ, डॉ.राहूल भावसार, डॉ.अमृत महाजन, डॉ.शुभांगी घुले, डॉ.रंजना शिंगणे, डॉ.निलेश बेंडाळे, डॉ.सारंग, डॉ.बिटे बी एम, डॉ.दिलीप ढेकळे यांची उपस्थीत होती.
याप्रसंगी डॉ.अनंत बेंडाळे यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांना नविन अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण प्रणालीचे प्रशिक्षण देण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये सक्षमतेवर आधारित शिक्षण प्रणालीमध्ये रुपांतर झाल्यामुळे नवनविन पद्धती आपल्या महाविद्यालयातील शिक्षकांना आत्मसात करण्यासाठी या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. दिवसभरात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा समारोप शनिवार दि.१५ जुलैला होणार आहे.