यावल (प्रतिनिधी) – येथील तहसील कार्यलयात राष्ट्रीय कुटूंब अर्थसाहाय्य योजना अंतर्गत मागील व चालु वर्षा मध्ये पात्र ७ लाभार्थ्याना दि. १३ / ०८ / २०२० गुरुवार रोजी चोपडा मतदार संघाचे शिवसेना सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रत्येक लाभार्थ्याला २० हजारांचा धनादेश देण्यात आले. सोबत फैजपुर उपविभागीय अधिकारी प्रांत डॉ अजित थोरबोले , तहसीलदार जितेंद्र कुवर , शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय कुटूंब अर्थसाहाय्य योजना अंतर्गत द्रारिद्ररेषेखालील कुंटूबातील कमवत्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यास मृताच्या कुंटूबाच्या व्यक्तीला एकरक्कमी अर्थसहाय्य दिले जाते या योजना अंतर्गत मागील व चालु वर्षा मध्ये ७ पात्र लाभार्थ्यी मध्ये बेबाबाई नारायण कोळी (डांभुर्णी ) , सरला प्रभाकर पाटील ( मोहराळे ) , आशाबाई भिका बांगर (साकळी ), मिराबाई जगन भिल ( वाघोदे ) , देवकाबाई पुंडलिक माळी (साकळी ) , कमलबाई रतन सनांसे ( सावखेडेसिम ) , नलाबाई विष्णू साळवे ( सावखेडेसिम ) या ७ लाभार्थ्याना दि. १३ / ०८ / २०२० गुरुवार रोजी चोपडा मतदार संघाचे शिवसेना सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रत्येक लाभार्थ्याला २० हजारांचा धनादेश देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक दिपक बेहेडे , शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे , शिवसेना तालुका संघटक गोपाळ चौधरी , शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना उपतालुका प्रमुख शरद कोळी, शिवसेना आदिवासी सेल तालुका प्रमुख हुसेन तडवी, युवासेना शहर अधिकारी सागर देवांग, शिवसेना शहर उपप्रमुख संतोष धोबी, शिवसेना अल्प संख्यांक तालुका संघटक अजहर खाटीक, युवासेना तालुका सरचिटणिस सचिन कोळी, शिवसेना शहर उपप्रमुख किरण बारी, शिवसेना शहर संघटक सुनिल बारी , युवासेना शहर समन्वयक सागर बोरसे ,आशिष झुरकाले , मयुर धोबी , सारंग बेहेडे , निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, सं. गां. नायब तहसीलदार भारती भुसावरे , सं. गां. अव्वल कारकून आर.बी. मिस्तरी यांच्या सह शिवसेना , युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकत्ते व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.







