जयपूर (वृत्तसंस्था) – मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो, पण आज ती मला पागल म्हणाली त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली आहे.
जयपूरच्या श्याम नगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या रवी कुमार यांनी रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्युपूर्वी रवी कुमारने मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केला होता. यामध्ये त्याने सांगितले की, मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो, पण आज ती मला पागल म्हणाली त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी रवीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. यामध्ये आत्महत्या का केली याचे कारण त्याने सांगितले आहे. रवी कुमार आणि त्याच्या बायकोमध्ये फोनवरुन भांडण झाले. यावेळी बायकोने रागात रवीला पागल म्हणाली होती. मात्र पागल म्हणाल्याने रवीला ते सहन झाले नाही. माझे पत्नीवर खूप प्रेम आहे. पण ती मला पागली म्हणाली, त्यामुळे मला दु:ख झाले आहे. म्हणून मी माझे आयुष्य संपवत आहे असे रवीने व्हिडीओत नमूद केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.