शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


शिरसोली : बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे विद्यमान सल्लागार संचालक मा.श्री नंदकिशोर पितांबर लावणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.मा.श्री निलेश भाऊ खलसे शालेय समिती चेअरमन मा.श्री दिलीप भाऊ बारी,सचिव श्री सुरेशभाऊ अस्वार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज बारी खजिनदार श्री कमलाकर तांदळे संचालक श्री प्रवीण पाटील, शशिकांत वाणी, अशोक काटोले,गिरीश वराडे रामकृष्ण धनगर, अर्जुन काटोले, उमाकांत बारी भास्कर बारी, अशोक बारी, संस्थेचे माजी अध्यक्ष रामदास नारायण बारी,सुभाष बुंधे,यादव रुपला बारी सर्व संचालक व सभासद मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर प्रभारी पर्यवेक्षक सुनील भदाणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील नागरिक, विद्यार्थी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक विभागामार्फत माध्यमिक, प्राथमिक व बालवाडी तील बालगोपालांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम देशभक्तीपर गीत, संगीत कवायत, समूह नृत्य वेशभूषा व भाषण सादरीकरण करण्यात आले संगीत कवायत या कार्यक्रमाचे मार्गदर्शन क्रीडा शिक्षक संजय काटोले यांनी केले. याप्रसंगी शाळेतील जे माजी विद्यार्थी विविध पदावर विराजमान झालेले आहेत जसे रेल्वेत अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक पोलीस या गुणवंत विद्यार्थ्यांच्या फलकाचे अनावरण स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आले सदरची संकल्पना श्री दिलीप भाऊ बारी व श्री निलेश भाऊ खलसे यांनी मांडली या कार्याला सर्व शिक्षकांचे अनमोल सहकार्य लाभले. सांस्कृतिक विभागातील शिक्षकांना सन्मानपत्र देण्यात आली तसेच नशामुक्त भारत याविषयी शपथ घेण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए टी बावस्कर यांनी केले सूत्रसंचालक जी बी काळे यांनी केले आभार प्रदर्शन सी एस कुमावत यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले गेले.








