क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे घटना; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पाचोरा | प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील लोहारा गावात क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध विविध कलमांन्वये पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी सायंकाळी फिर्यादी गणेश तुकाराम कोळी (वय ४५, रा. लोहारा , ता. पाचोरा) हे कामावरून घरी आले असता त्यांच्या चुलत काकांच्या नातवंडे घरासमोर क्रिकेट खेळत होती. त्यांना घरी जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून रात्री सुमारे ८.३० वाजता आरोपी फिर्यादीच्या घरासमोर आले.
तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या आईला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व चापटांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी विजय विठ्ठल कोळी, संजय विठ्ठल कोळी, सुपडू पंढरी कोळी, अनिता संजय कोळी, अनिल कोळी (पूर्ण नाव माहिती नाही), हर्षल सुनील कोळी, कुसुमबाई विठ्ठल कोळी, महेंद्र सुभाष कोळी, मनीषा अनिल कोळी आणि छाया विजय कोळी (सर्व रा. लोहारा , ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तात्याबा पोपट नागरे करीत आहेत.









