चौघाविरूध्द गुन्हा दाखल
जळगाव (विशेष प्रतिनिधी)- औरंगाबाद येथील प्रवाशी वाहतूक करणार्याला चालकाला जळगाव तालुक्यातील उमाळा येथे जायचे असल्याचे सांगितले. प्रवाशी भाडे ठरल्यानंतर चालकाने चौघा प्रवाश्यांना उमाळा येथे दि.10 रोजी मध्यरात्री सोडले.मात्र त्यावेळी चौघांनी चालकाच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून लुटण्याचा प्रयत्न केला.त्यात चालकाला मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
सिडको बस स्थानक औरंगाबाद येथे टोयटा कार क्र.(एम.एच.20, ईजी 6065) घेवून चालक भागवत रामभाऊ मुळे रा.पैठण रोड,इटखेडा जि.औरंगाबाद हे उभे होते.यावेळी अज्ञात चारजण त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले की,आम्हाला जळगावच्या उमाळा येथे जायचे आहे.त्यासाठी 3500 रूपये ठरले.यावेळी चालकाने चारही इसमाचे मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले होते.या प्रवाश्यांनी अडव्हान्स म्हणून फोनपेद्वारे 500 रूपये तर रोख 1000 रूपये दिले होते.सिल्लोड मार्गे जात दि.9 रोजी रात्री 9 वाजता निघाल्यावर रात्री 12.30 च्या सुमारास उमाळा येथील फाट्यावर आल्यावर कारमधील चौघे प्रवाश्यांना उरलेले प्रवाशी भाड्याचे रूपये 2 हजार कारचालकाने मागितले.त्यातील एका प्रवाश्याने कारची चावी मागितली.ति देण्यास नकार दिला असता दुसर्याने बॅगेतून मिरची पूड काढत कारचालकाच्या डोळ्यात फेकली.तसेच इतरांनी चावी हिसकावण्यास सुरूवात केली.चावी मिळत नसल्याने सर्वांनी चालकाला मारहाण करण्यास सुरूवात केली.त्यावेळी चालक मुळे यांच्या खिशातील 5 400 रूपये काढले व 10 हजार रूपया किमंतीचा मोबाईलही हिसकावला.चालकाने आरडाओरड केल्याने गावातील 8 ते 10 जणांनी धाव घेतली त्यावेळी चौघेजण पसार झाले.
फिर्यादी चालक भागवत मुळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सफौ रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, योगेश बारी करीत आहे. यातील दोन संशयीत आरोपींची नावे निष्पन्न झाले असून त्यांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.