मुंबई (वृत्तसंस्था) – स्पेसएक्स आणि टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी एकाच दिवशी चार कोरोना टेस्ट केल्या. यावर त्यांनी कोरोना चाचण्यांवर खळबळजनक दावा केला. यापैकी दोन पॉझिटिव्ह, दोन निगेटिव्ह आल्या आहेत. यावर मस्क यांनी प्रश्न उपस्थित केला. कोरोना चाचण्यांत काहीतरी गडबड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एलन मस्क यांनी मार्चमध्ये म्हटलं होतं, की कोरोनाचा एप्रिलपर्यंत एकही पेशंट अमेरिकेत सापडणार नाही. परंतु अमेरिका सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारा देश ठरला आहे.काहीतरी घोटाळा सुरू आहे. आज माझी चार वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली. यापैकी दोन पॉझिटिव्ह, दोन निगेटिव्ह आल्या. एकच मशीन, त्याच टेस्ट आणि त्याच नर्स. रॅपिड अँटीजन टेस्ट आहे.
यानंतर मस्क त्यांनी सांगितलं, की दुसऱ्याला लॅबमधूनही पॉलिमरीज टेन रिअक्शन टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टचा रिझल्ट येण्यासाठी २४ तास लागणार आहेत. रायटर्सनुसार मस्त हे रॅपिड ॲक्शन टेस्टबाबत बोलता आहेत. सप्टेंबरमध्ये कंपनीने सांगितलं होतं, की अमेरिकेच्या नर्सिंग होम मधून येत असलेल्या या उलट सुलट प्रकारचा तपास करत आहे. त्यांचे कोरोना टेस्टिंग इक्वीपेमेंट चुकीचं रिझल्ट देत आहे.
जगभरात कोरोनाचे रुग्ण ५. २६ कोटी झाले असून १२९१९२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जगातील सर्वात शक्तिशाली देश कोरोना व्हायरस मारामारीच्या नव्या लाटेने हाहाकार घातला आहे. तेथे गेल्या चोवीस तासांत तब्बल दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णसमोर येत आहेत. सध्या कोरोना बाधिताचा एकूण आकडा दहा कोटी ५५ लाख ९ हजार १८४ वर पोहोचला आहे.
दरम्यान ,या ट्विटरवर एका युजरने ‘यामुळेच अमेरिकेत कोरोना रुग्ण एवढे वाढले का?’
असे विचारले. यावर मस्क यांनी उत्तर दिले. ‘माझ्यासोबत झालं ते इतरांसोबत सुद्धा होत आहे’ असं म्हणत मस्क यांनी कोरोना चाचणीवर शंका उपस्थित केली आहे. एका ट्विटर युद्ध युजरने त्यांना ‘कोणती लक्षणे दिसली?’ असे विचारलं तेव्हा त्यांनी ‘सर्दी ताप आला होता मात्र काही संशयास्पद लक्षणे दिसली नाही’







