जळगाव (प्रतिनिधी) – अकोला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता तथा सध्या रुजू झालेले जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी सुधीर गिरधर धिवरे, यांच्याविरुद्ध दि. २० मार्च २०२० रोजीच्या शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येऊन आज दि. १२ नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आल्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव ग.सं.कचरे यांनी दिले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत सुधीर गिरधर धिवरे, कार्यकारी अभियंता यांचे मुख्यालय अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, जळगाव अंतर्गत राहील आणि त्यांना सक्षम प्राधिका-याच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यांचे मुख्यालय सोडून जाता येणार नाही.,तसेच जोपर्यंत हे आदेश अस्तित्वात राहतील, त्या कालावधीसाठी, सुधीर धिवरे, कार्यकारी अभियंता यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम-६८(१)(ए) अन्वये निर्वाह भत्ता ब पूरक भत्ते देय राहतील. व निलंबन कालावधीत यांना महाराष्ट्र नागरी सेवा (बर्तणूक नियम, १९७९ च्या नियम-१६ मधील तरतूदीनुसार खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही अथवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही. श्री. धिवरे यांनी खाजगी नोकरी स्विकारली अथवा काही व्यवसाय केला तर, उक्त नियमातील तरतूदीनुसार, गैरवर्तणुकीबाबत त्याना दोषी समजण्यात येऊन,त्यांचेविरुद्ध कारवाई करण्यास ते पात्र होतील आणि अशा परिस्थितीत, निर्वाह भत्ता मिळण्याचा हक्क ते गमावतील.असेही आदेशात म्हटले आहे.








