जळगाव (प्रतिनिधी) – अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या शाखांचे उद्घाटन होत असतांना अलीकडेच याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात सुद्धा रोवल्या गेली. उत्तर महाराष्ट्र विभागात जळगाव जिल्ह्याची कार्यकारणी स्थापित झाली आहे.

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय संयोजक मंगेश त्रिवेदी, महाराष्ट्र राज्य सहप्रभारी डॉ. मनोज निलपवार, गंगाप्रसाद खरात, भूषण मेश्राम, जयंत पाटील, राहुल येवला तर राज्य महिला प्रभारी जयश्री उंबरे यांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्ह्याची कार्यकारणी स्थापन झाली आहे. त्यात. जिल्हा महिला प्रभारी हेमांगिनी सोनवणे, महिला सहप्रभारी भारती सोनवणे, जिल्हा प्रभारी प्रा.अविनाश कुमावत, सहप्रभारी एकनाथ बावणे, जिल्हा मिडिया प्रभारी प्रा.कृणाल महाजन आहेत तर सदस्य म्हणून डॉ. आदित्य माहेश्वरी, अरविंद सापकर, मनीषा कुलकर्णी, रजनी भावसार, ज्योती पाटील आदींची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून योगाचा प्रचार आणि प्रसार, योगशास्त्रास प्रमुख विषय म्हणून मान्यता मिळवून देणे, योग शिक्षकांचे अडचणी सोडवून त्यांना योग्य प्रशिक्षण पुरविणे आदि प्रमुख उद्देश घेऊन संघटन कार्य करणार आहे.







