जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, जळगाव येथील १०वी तील विद्यार्थ्यांचा १००% निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळालेले आहे. त्यामध्ये अमेय ललित चौधरी ९९%, चिन्मया संजय नारखडे९६%, अनम अखिल पटेल ९६%, साग्निक रक्षित ९५%, नियंती जयेश पाटील ९५%, आकांक्षा सुनील शिट ९२%, केतन बापू निकम ९१%, शयान मोहम्मद शेख ९१%, प्रणाली अजय वाणी ९०%, हुझेफा अल्ताफ हुसेन पटेल ९०%, नंदिनी सिंग हिला ९०% गुण प्राप्त झालेले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल आदरणीय गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिकानीलिमा चौधरी व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.