नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – दिल्लीतील गोकलपुरी येथे शुक्रवारी रात्री आगीत सात जणांचा मृत्यू झाला.मध्यरात्री आग आटोक्यात आणण्यात आली, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाने आज दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून सात मृतदेह बाहेर काढले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अतिरिक्त पोलिस उपायुक्त (ईशान्य) देवेश कुमार महला यांनी सांगितले की, आगीची माहिती पहाटे १ च्या सुमारास मिळाली, आम्ही पहाटे ४ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणू शकलो,”
आगीत साठ झोपड्या जळून खाक झाल्या.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.”सकाळी ही दुःखद बातमी ऐकली. मी घटनास्थळी जाईन आणि बाधित लोकांना वैयक्तिकरित्या भेटेन,” असे त्यांनी म्हटले आहे.