पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा ते मोंढाळा रस्त्यावर सालासर जिंनिगजवळून गेलेल्या पाटचारीच्या मोरीचे काम उंच आणि निमुळत्या स्वरुपाचे केल्याने अपघाचे प्रमाण वाढले आहे बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी याबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार केली आहे

या पाटचारीच्या मोरीवर असलेल्या रस्त्याने मोटारसायकल तसेच इतर वाहने हवेत उंच उडतात आणि शेतात किंवा रस्त्यावर समोरुन येणाऱ्या वाहनांवर आदळतात त्यामुळे वाहनचालकाचा वाहनावरिल ताबा सुटतो अपघात होवून वाहन चालकाला किंवा वाटसरुला दुखापत होते एखाद्या वेळेस जिवदेखिल गमवावा लागू शकतो अशी भहिती व्यक्त करण्यात येत आहे . सार्वजनिक बांधकाम खात्याने या पाटचारी मोरीचा उंच आणि निमुळतेपणा तात्काळ काढून व्यवस्थित उताराचा रास्ता तयार करावा वाहन हवेत उडणार नाही याची दक्षता घेवुन उपाय योजना व दर्जेदार काम करण्यात यावे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.








