जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पाळधी पासुन एक कीलोमीटर अंतरावर चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण ठार झाल्याची घटना सोमवारी 3 :15 सुमारास घडली. या भिषण अपघातात दुचाकीवरील पंकज मोहन तायडे वय ३२ रा. कला वंसत नगर , आसोदा रेल्वेगेट जळगाव व धनंजय गंगाराम सपकाळे वय ४२ रा. स्टेट बँक कॉलनी जळगाव तर चारचाकी चालक प्रविण प्रकाश पाटील वय 38 रा. भराडी ,(ता. जामनेर) हे तीन जण ठार झाले आहे.
शेंदुर्णी येथुन फॉर्चून फायनान्स या बँकेचे शाखा व्यवस्थापक धनंजय सपकाळे व सेल्स एक्झिक्युटिव्ह पंकज तायडे हे दोन्ही (एम.एच.१९ डी.आर.१४१९) युनिकॉन या दुचाकीने बँकेचे कामकाज आटोपून जळगावकडे परतत येत असतांना जळगाहुन पहुरकडे जाणार्या चारचाकी (एम.एच.१९ सीयु.७१६१) दुचाकीला जोरदार धडक पाळधी पासुन एक कीलोमीटर अंतरावर बळीराजा ढाबा जवळ जोरदार दिली. धडक इतकी जोरदार होती की अपघातात दुचाकीस्वारासह मागे बसलेल्याचे हात व पाय शरीरापासुन वेगळे तुकडे होऊन रस्त्यावर पडले होते. दुचाकीवरील पंकज तायडे व धनंजय सपकाळे हे जागीच ठार झाले. तर चारचाकी चालक प्रविण पाटील याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पहूर पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे. मयतांच्या नातेवाईक यांनी जळगाव सिव्हिल हाँस्पिटल मध्ये आक्रोश केला आहे.