चाळीसगाव (प्रतिनिधी) – माजी आमदार स्व. जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याहस्ते ट्रामा केयर सेंटर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष के.बी.दादा साळुंखे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, भाजप तालुकाध्यक्ष प्रा. सुनिल निकम, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, रा.वी. संचालक विश्वासराव चव्हाण, पालिकेतील गटनेते नगरसेवक संजय पाटील, नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन आदी मान्यवर उपस्थित







