ग्रामस्थांनी न घाबरता चाचणी करा – डॉ.विजया झोपे
चिनावल, ता.रावेर (वार्ताहर) – चिनावल येथे दि.११ आगस्ट रोजी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणी शिबिराला अल्प प्रतिसाद मिळाला चिनावल येथील कोरोना या संसर्ग जन्य रोगाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी न घाबरता चाचणी करण्याचे आवाहन चिनावल प्रा.आ.केद्र च्या वैद्यकीय अधिकारी डॉ विजया झोपे यांनी केले आहे.
कोरोना सद्रुष लक्षणे असलेल्या ग्रामस्थानी तसेच दुकानदार, व्यावसायिक व गर्दी जागी संपर्क आलेल्या ग्रामस्थांनी कोरोना चाचणी करून घ्यावी जेणेकरून गावातील साखळी तोडण्यास मदत होईल.
कोरोना हा बरा होणारा आजार आहे आरोग्य विभाग , प्रशासनाने तसेच ग्रामपंचायत स्तरावरून या बाबत ची सर्वतोपरी जनजागृती व इलाज केले आहे व या पुढे ही करणार आहे. काल झालेल्या तपासणी शिबिराला अल्प प्रतिसाद मिळाला तो योग्य नाही नागरिकांनी न घाबरता चाचणी करून घेतल्यास स्वता सोबत इतर ही आजारांपासून सुरक्षित राहतील तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या शिबिर ठिकाणी जाऊन चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.