जळगाव ( प्रतिनिधी ) – रूख्मीणी नगरातील तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगावातील रूख्मीणी नगरात राहणारी ३२ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. शिवकॉलनीत राहणारा निलेश दत्तात्रय सोनजे याने तरूणीला लग्नाचे अमिष दाखवत १२ मे २०१९ ते १३ सप्टेंबर २०२२ दरम्यान वेळोवळी तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा अत्याचार सहन न झाल्याने तरूणीने संबंध ठेवण्यास नकार दिला. याचा रागातून निलेश सोनजे याने तरूणीला मारहाण करून तिला व तिच्या परिवाराला जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी तरूणीने मंगळवारी ११ ऑक्टोबर रेाजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निलेश दत्तात्रय सोनजे रा. शिवकॉलनी जळगाव याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तास सपोनि रोहिदास गभाले करीत आहे.