जळगाव (प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या अॅथलेटीक्स पुरस्कारमध्ये रावेरचा श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालयीन खेळाडू आसीफ तडवी यांचें नाव झाहीर झाले. हा महाविद्यालयाला प्राप्त झालेला सलग दुसर्या वर्षाचा बहुमान आहे. रावेरमध्ये मैदानी खेळाचा जोरात प्रसार व प्रचार होत आहे. अनेक खेळाडू अंतरविद्यापीठ अशमेध स्पर्धात चमकदार कामगीरी करत आहे. मागील वर्षामध्ये विद्यापीठस्तरावरील मैदाणी स्पर्धेत श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालयाने प्रथम पारितोषीक मिळवले होते तसेच महाविद्यालयाचा खेळाडू भागवत महाजन सर्वकृष्ठ खेळाडू ठरला. हि पंरपरा सतत सुरू असून याबाबत विविध खेळाडूंनी आसिफ तडवी यांचे कौतुक करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
प्रा. उमेश पाटील यांचे मार्गदर्शनामुळेच पुरस्कार घेता आला- खेळाडू आसिफ तडवी
मी व्ही एस नाईक महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर गेल्या 5 वर्ष मी सराव करत आहे. महाविदयालयाचे स्वत:चे असे विशाल असे अॅथलेटीक्स मैदान असल्यामुळे व क्रीडा संचालक प्रा. उमेश पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन असल्यामुळे हा पुरस्कार मला घेता आला. मैदाणी खेळात यशासाठी सरावासोबत शिस्त, संयम, आत्मविश्वास आणी अखंड ईच्छाशक्ती व आमच्या सारख्या ग्रामीण खेळाडूसाठी योग्य दिशा आवश्यकता असते. हे वातावरण महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर असल्यामुळे माझ्यासारख्या अंनत गरीब खेळाडूनां भावी करीअरसाठी खुप मोलाचे आहे.त्यामुळे मी संस्थेचे चेअरमन हेमंतभाऊ नाईक, प्राचार्य प्रा. डॉ.परेश दलाल, क्रीडा संचालक उमेश पाटील, ईस्माईल तडवी यांचे आभार मानल्याचे पुरस्कार प्राप्त खेळाडू आसीफ तडवी यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.
व्ही.एस. नाईकचा खेळाडूची परंपरा कायम- प्रा.उमेश पाटील
आजपर्यंत आमच्या महाविद्यालयाच्या अनेक खेळाडूंनी विवीध खेळात अनेक पुरस्कार मिळवले त्यात आंनदाची बाब म्हणजे सलग दुसर्या वर्षी बेस्ट खेळाडू या पुरस्कारासाठी प्राप्त ठरला ही पंरपरा अशीच कायम राहील आणी यापुढे महाविद्यालयातील खेळाडू सगळ्या खेळात वर्चस्व गाजवतील ही आमच्या महाविद्यालयासाठी आंनदाची बाब आहे. मैदाणी खेळात नियमीत खेळाडू सराव करतात आमच्याकडे मोठे अॅटलेटिक्स मैदान आहे संस्थेचे चेअरमन हेंमत नाईक, प्राचार्य परेश दलाल, अनील पाटील व सर्व प्राध्यापक वृंद यांचे खेळाडूंना सहकार्य असल्याचे क्रीडा संचालक प्रा. उमेश पाटील यांनी सांगितले.