जळगाव (प्रतिनिधी) –उड्डाण पुलाचा आर्म जर माल धक्क्याकडून वळवला तर येथील मालमत्ता धारकांच्या जागा सुद्धा बाधित होणार नाही. म.न.पा.ला आर्थिक मोबदला सुद्धा देणे येत नाही. शिवाय पिंप्राळा रोडवरच आर्म जोडला तर केवळ साडेसात मीटरचा रस्ता मिळतो. तो २० वर्षानंतर वाहतुकीला अरुंद होईल. त्या एवजी रेल्वे मालधक्क्यावरील रोडला जोडला तर तो जवळ जवळ १५ मीटर रुंदीचा मिळेल.
हा दुध फेडरेशन, जुना हायवे व बजरंग बोगद्या, एस.एम.आय.ती.चौक कडून वाहतुकीस मुख्य रोड म्हणून वापरता येईल व शहराची अडचण सुटेल मालधक्का स्थलान्तर जर होणार आहेच तर त्या रोडची वाहतूक जवळ जवळ संपुष्टात येईल. व हल्ली रेल्वे कडून तयार होत असलेला रोड चांगल्या प्रतीचा असल्यामुळे अनेक वर्ष तो खराब होणार नाही. या विस्तीर्ण आर्म जोडणीने शहराच्या सोन्दर्यात नक्कीच भर पडेल. आदरणीय भाऊ आपणच रेल्वे प्रबंधक, दोघ खासदार व रेल्वे मंत्रालयाला सदर विषय पटवून देऊ शकतात. आ.राजूमामा व म.न.पा.ची सुद्धा हीच इच्छा वृत्त पत्रातून वाचायला मिळाली. तीच आम्हा रहिवाश्यांची सुद्धा मागणी आहे पर्यायाने मालधक्का सुद्धा लवकर स्थलांतर होईल हे दोघ मुद्दे एकत्रित पणे जनतेच्या फायद्या साठी घडून येतील. अशी मागणी जिल्हाध्यक्ष भा.ज.पा.शिक्षक आघाडी प्रवीण जाधव यांनी केली.







