जळगाव (प्रतिनिधी) – आज दि.११ ऑगस्ट रोजी जळगाव शहर महानगरपालिकेतील सभागृहात सर्व मनपा अधिकारी व नगरसेवकांची एक विशेष बैठक माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी घेतली. परंतु या बैठकीत आ.महाजन यांनी जळगाव महानगरपालिकेतर्ंगत येणार्या कोविड हॉस्पिटल संदर्भात तसेच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यासंदर्भात, शिवाजी नगर पुलाचे बंद असलेल्या कामाबाबत असो की जळगाव शहरात वाढत असलेले कोरोना रुग्ण, ११ रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तीने आत्महत्या केल्या यासंदर्भात विचार करण्यासाठी बैठक होती, की नेमकी राज्यात सुरु असलेले राजकारणावर खलबत्ते करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेत बैठक घेतली होती, काही पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारले असता त्यांनी राज्यात सुरु असलेले राजकारणासंदर्भात उत्तरे दिली ही उत्तर जळगावकरांना अपेक्षित नाहीत, जळगावकरांना अपेक्षित उत्तरे मनपा सत्ताधारी देणार की विरोधक? जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, परंतु मनपा प्रशासन असो कि सत्ताधारी याबाबत कुठलेही नियोजन नेमके कुणीही करीत नाही, लोक मरताहेत तरीसुध्दा कुंभकर्णाची झोप घेत आहेत सत्ताधारी.







