जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरातील विवाहितेने माहेरुन पंधरा लाख रुपये आणावेत या कारणावरुन तिचा छळ करणाऱ्या पतीसह तीन जणांविरोधात मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी शनिपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरातील माहेर असलेल्या रुपाली सचिन शेंद्रे यांचा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील सचिन रामेश्वर शेंद्रे यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर २४ फेब्रुवारी २०२१ ते ८ नोव्हेंबर २०२२ या काळात रुपाली हिने माहेरुन पंधरा लाख रुपये आणावेत या कारणासाठी तिचा पतीसह सासरच्यांनी शिवीगाळ तसेच माहराण करत शारिरीक व मानसिक छळ केला, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. छळाला कंटाळून रुपाली ह्या माहेरी निघून आल्या व मंगळवारी त्यांनी याबाबत शनिपेठ पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन रुपाली हिचे पती सचिन शेंद्रे, सासू मनोरमा रामेश्वर शेंद्रे, सासरे रामेश्वर नागोराव शेंद्रे ( सर्व रा. परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती ) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद विनायक पाटील हे करीत आहेत.