नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अमेरिकेतील जनतेने बायडन यांना मोठ्या प्रमाणात मतं दिले. त्यामुळे रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. त्यामुळे व्हाईट हाऊसवर आता बायडन विराजमान होणार आहे. तर उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरीस यांचे नाव समोर आले आहे. त्यापार्श्वभुमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडन यांना राष्ट्रपती पद मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर मोदी म्हणाले की, भारत-अमेरिकेचे संबंध सुरूवातीपासूनच चांगले असून, या संबंधाला अधिक घनिष्ट करण्यासाठी सोबत मिळून कामकाज करू. अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली आहे. तसेच मोदींनी भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या. हॅरीस उपराष्ट्रपती झाल्याने भारत आणि अमेरिकेतील जनतेला गर्व होत असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.







