आरोपींना फाशीची द्या : पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन
पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील टोळी येथील महाविद्यालयीन विदयार्थीनी सामूहिक अत्याचार झाला असून तिला विष पाजून ठार करण्यात आले. सदर घटना ही मानवतेला काळिमा फासणारी असून जनसामान्यांचे हृदय पिळवून देणारी आहे. पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी आज पारोळ्यात सर्व पक्षीय सर्व समाज संघटना एकत्र येऊन मोर्चा काढण्यात आला.
यावेळी सर्व सामाजिक संघटने मार्फत पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे याना निवेदन देण्यात आले. आरोपींना तात्काळ अटक करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, पीडित तरुणीच्या परिवाराला संरक्षण मिळावे यासह इतर मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या. यावेळी भीम आर्मी सामाजिक संघटना, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी , पीपल्स रिपब्लिक पार्टी , दलित सेना, वाल्मिकी मेहतर समाज, चर्मकार समाज संघटना, बहुजन क्रांती मोर्चा, एकलव्य सेना, मल्हारी सेना, चर्मकार उठाव संघटना इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या. जितेंद्र वानखेडे, दिपक अनुष्ठाण, भाऊसाहेब सोनवणे, दयाराम मोरे, सुनील जाधव, संजय भावसार, विजय मोरे, भगवान सोनवणे, मनोहर केदार, गौतम पवार, शिवम पवार, विजय बागुल, कमलेश सोनवणे, सचिन खेडेकर इतर उपस्थित होते.