रावेर ( प्रतिनिधी ) – शहरातील २१ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफासाने दुपारी आत्महत्या केली. रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल मधील बनाथाली गुरु होगली येथील मुळ रहिवाशी शितल मलिक हे पत्नी मौसमी मलिक (वय-२१) यांच्यासह वास्तव्याला आहे. हे पती पत्नी हे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतात. शहरातील चौराहा येथील भाड्याच्या घरात रहायला आहे. ९ मे रोजी दुपारी राहत्या घरात ओढणीच्या मदतीने गळफास घेवून मोसमी मलिक यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण लगेच समजू शकले नाही. अतुल सुरेश सपकाळे यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना सुरेश मेढे करीत आहेत.