जळगाव ( प्रतिनिधी ) – ३५वी पुरुष व ३१महिला गट राज्य अजिंक्यपद आटयापाटया स्पर्धा शेगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्हा पुरुष व महिला संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा सिध्दी विनायक विद्यालयात गुरूवार दि१२/५/२०२२रोजी सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व खेळाडूंनी सकाळी ८:०० वाजता सिध्दी विनायक विद्यालयात उपस्थित राहावे. आधिक माहिती साठी सिध्दी विनायक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री अनिल माकडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आटयापाटया संघटनेचे अध्यक्ष आण्णासाे प्रा. चंद्रकांत सोनवणे व सचिव डॉ प्रदिप तळवेलकर यांनी केले आहे.