जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील रेल्वेस्थानक परिसरात अंदाजे ४० वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला मयताची ओळख पटविण्याचे आवाहन भुसावळ लोहमार्ग पोलीसांनी केले आहे.
जळगाव रेल्वे स्थानकातील रेल्वे मजदूर युनियनच्या कार्यालयासमोर १० मे रोजी दुपारी एका अनोळखी अंदाजे ४० वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. कोणत्यातरी दिर्घ आजाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज केला जात आहे. लोहमार्ग पोलीसांना माहिती मिळताच हा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. मयताच्या हातावर दशरथ गशाके असे नाव गोंदलेले आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. अंगावर आकाशी रंगाचा बनियान व हिरव्या रंगाची पॅन्ट आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन भुसावळ लोहमार्ग पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र ठाकूर करीत आहेत.