वरणगाव ( प्रतिनिधी ) – दारूच्या नशेत महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला वरणगाव पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या शहरातील एका भागात ४५ वर्षीय महिला कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी संदीप लखीचंद बनवे (वय-३८) याने ९ एप्रिल रोजी रात्री दारू पिऊन महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिच्यावर अतिप्रसंग करत जबरदस्ती करू लागला. तिने हटकले असता तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला धमकी दिली. फिर्यादी महिलेने वरणगाव पोलीस ठाण्यात आरोपी संदीप बनवे याच्या विरोधात तक्रार दिली . महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ मुकेश जाधव करीत आहेत.