जळगाव ( प्रतिनिधी ) – अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील कर्मचारी आणि एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या पथकाने जुन्या मोहाडी रस्त्यावरच्या शेतातील जुगाराच्या डावावर धाड टाकून १३ हजार ५०० रोख व ६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत . या धाडीत ३ आरोपींच्या विरोधात एम आय डी सी पोलिसपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक पो कॉ अजय पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आज अजय पाटील यांच्यासह पो.उ नि सुनिल चौधरी, पो.हे. कॉ. प्रविण पाटील, सचिन विसपुते, पो. का. भरत डोके हे अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयात असताना अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी कळविले की, त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली आहे की, शिरसोली शिवारात जुन्या मोहाडी रस्त्यावर पाचनदेवी मंदिराच्या शेताजवळ काही लोक झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळत आहेत . तुम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक घेवून धाड टाका
त्यांनतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोउनि निलेश गोसावी, सचिन मुंढे, पोना समाधान टहाकळे, पोशि शुद्धोधन ढवळे आदींचे पथक पंचांना सोबत घेवून खाजगी वाहनाने गेले जुन्या मोहाडी रस्त्याने पायी गेल्यावर पाचनदेवी मंदिरासमोर शेतात काही लोकांच्या हातात पत्ते दिसल्याने हा छापा टाकला काही लोक पोलिसांना पाहून पळून गेले. त्यापैकी गजानन समाधान हटकर ( वय ३५ रा.तांबापुरा ) , शरीफ लोहार गुलमोहम्मद ( वय ४९ .रा.गेंदालाल मिल ) , संतोष चुडामण चव्हाण ( वय ५२ रा. सामनेर ता.पाचोरा ) या आरोपींना अटक करण्यात आली त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली या आरोपींच्या ताब्यातून एकूण १३ हजार ५०० रोख व ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.