जळगाव ( प्रतिनिधी ) – रस्त्याने पायी जाणाऱ्याला भरधाव येणाऱ्या मोटारसायकलने धडक देवून पायाला गंभीर दुखापत केल्याची घटना जुनी पोस्टल कॉलनी भागात घडली अज्ञात मोटारसायकल चालकावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार अनंत लढे (वय-५१ , रा. जुनी पोस्टल कॉलनी, एम.जे. कॉलेजच्या मागे ) हे बांधकाम व्यवसायिक आहेत . ९ एप्रिल रोजी सायंकाळी ते घरासमोरील रस्त्याने पायी जात असताना (एमएच १९ डिक्यू १४००) या मोटारसायकलने भरधाव वेगाने येवून तुषार लढे यांना धडक दिली. या अपघातात तुषार यांचा उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १० एप्रिल रोजी दुपारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तुषार लढे यांच्या फिर्यादीवरून (एमएच १९ डिक्यू १४००) क्रमांकाच्या दुचाकीवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहेत.