अमळनेर ( प्रतिनिधी ) – येथील गायत्रीनगरात घरफोडी करून सोन्या चांदीच्या देवांच्या मुर्त्या, मणी मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघड झाली अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय योगेश्वर हायस्कूल जवळील गायत्री नगरातील रहिवाशी सुचेता अरुणराव साळुंखे यांच्या घरात बुधवारी ते गुरुवारी सकाळपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी ८४ हजार ७०० रुपये किमतींचे सोन्या चांदीच्या देवांच्या मुर्त्या तसेच मंगळसूत्र चोरून नेले.अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरीफ पठाण करीत आहेत.