जळगाव ( प्रतिनिधी ) – कपिल शर्माने विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला म्हणून ‘कपिल शर्मा शो’चा सर्व शक्ती सेनेकडून निषेध करण्यात येत आहे .
‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. निर्मात्यांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये चित्रपटाचे प्रमोशन करायचे होते. मात्र, कपिल शर्माने विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला कारण या चित्रपटात मोठा स्टार नाही काश्मीरमधून हिंदूंना कसे बाहेर पडायला लावले हा हिंदूंचा मुद्दा आहे.कपिल शर्माला कडाडून विरोध राष्ट्रीय अध्यक्ष नीरज सेठी यांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडण्याची घोषणा केली असून सर्व शक्ती सेना कपिल शर्मा शोला प्रत्येक जिल्ह्यात विरोध करणार आहे. हा हिंदूंशी निगडीत मुद्दा आहे.आणि निर्माते हे इतर धर्माचे आहेत त्यामुळे या चित्रपटाला पुढे येऊ दिले जात नाही , असेही सेठी म्हणाले . .सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.संजय मोरे यावेळी उपस्थित होते .
निवेदन देताना भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा राज्य सचिव चत्रभूज सोनवणे , सर्व शक्ती सेना प्रभारी जळगाव जिल्हाध्यक्ष मयुर कोळी , अँड नितेश महाजन, सुभाष डागा, सर्व शक्ती सेना व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष जिजाबराव पाटील , प्रदीप पानपाटील , विकास सपकाळे ,कृष्णा सावळे , ,हरलाल कोळी , संदीप सावळे, विनोद सपकाळे, राजेंद्र पाटील , धनराज कोळी , दीपक चौधरी ,विजय तायडे , गजानन काडेले , प्रा.सुभाष सपकाळे , संदीप गाढे , दिपक वानखेडे, दीपक तायडे, उमेश तायडे आदी उपस्थित होते .